Pune News

Pune News : भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने अनोखे आंदोलन

495 0

पुणे : भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात (Pune News) राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी अनोखे आंदोलन करण्यात आले. या वेळी कोथरूड मध्ये ठिकठिकाणी बॅनर लावून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सुनील कांबळे यांचा निषेध व्यक्त केला. ससून हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमांमध्ये स्टेजवरून उतरत असताना तोल जाऊन पडणाऱ्या सुनील कांबळे यांना सावरणाऱ्या पोलिसाच्या कानशिलात लगावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप आमदार आमच्या रक्षकांचे भक्षक बनले असल्याच्या घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने यावेळी जनतेचे लक्ष वेधून घेतले.

अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी माध्यमांशी बोलत असताना सांगितले की हा एका पोलिस कर्मचाऱ्याचा नसून संपूर्ण महाराष्ट्र पोलिसाचा व त्याबरोबरच सामान्य जनतेचाही अपमान आहे. जर ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी मीडिया व कॅमेरा असताना आणि जनतेने गजबजुन भरलेल्या समारंभाच्या ठिकाणी भाजप आमदार असे वागत असतील तर जनतेने विचार करायला हवा की हे त्यांच्याशी कसे वागतील असेही गिरीश गुरूनानी यांनी सांगितले.

भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरूनानी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील नोंदवली आहे. या वेळी राष्ट्रवादी युवक चे ऋषिकेश शिंदे,तेजस बनकर,सचिन यादव,आयुष बोडके,स्वप्नील धारिया,पृथ्वी दहिवाळ,आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!