Pune News

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

531 0

पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून (Pune News) मोठ्या प्रमाणात ड्रग्स साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठा दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शहराजवळच एक दोन हजार नाही तर तब्बल तब्बल 9000 लिटर दारू जप्त केली आहे.

उरुळी कांचन पोलीसांनी ही कारवाई केली. पुणे शहराजवळ सोरतापवाडी जवळ पोलीसांनी हातभट्टीवर मोठा छापा टाकून जवळपास नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. सोरतापवाडी भागात पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली. एका कारवाईत पोलिसांनी 525 लिटर दारू तर दुसऱ्या कारवाइत 9 हजार लिटर हातभट्टी दारूचे कंटेनर जप्त केले. पोलिसांनी याचदरम्यान दारू तयार करण्यासाठी लागणारे पाच हजार लिटर रसायन जप्त केलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!