Pune News

Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड

1003 0

पुणे : जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंटच्या एमबीए प्रथम वर्षात शिकणारा विद्यार्थी (Pune News) आशुतोष खाडे याची हिमाचल प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग अँड अलाईड स्पोर्ट्स (ABVIMAS) हातकोटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय स्वयंम सेवा (NSS) साहसी शिबिर 2023-24 साठी निवड झाली आहे. आशुतोष खाडे याची ही निवड सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत करण्यात आली आहे.

विद्यार्थी आशुतोष खाडे यांची एनएनएसच्या राष्ट्रीय स्तरावरील साहसी शिबिरासाठीची निवड ही त्याचे कौशल्ये, नेतृत्वगुण आणि वैयक्तिक आणि सामाजिक विकासासाठी वचनबद्धतेचा दाखला आहे. राष्ट्रीय स्तरावर आयोजित केलेले एनएनएस साहसी शिबिर, विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक वातावरणात त्यांची नेतृत्व क्षमता, टीमवर्क आणि लवचिकता दाखवण्याची संधी असते.

जीएचआरसीईएम, पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.आर.डी. खराडकर, म्हणाले की, आशुतोष खाडे यासारखे समर्पित आणि कर्तृत्ववान विद्यार्थी आमच्या एमबीए विद्याशाखेत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. त्याच्या या यशाने केवळ स्वत:चाच नाही तर एमबीए विभाग आणि संपूर्ण जीएचआरसीईएमचाही सन्मान केला आहे. रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, रायसोनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी संचालक श्री श्रेयस रायसोनी, एमबीए विभागा प्रमुख डॉ. शिवानंद सनमथ, आणि एमबीए विभाग यांनी आशुतोष खाडे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime News : खळबळजनक ! केस पडल्याच्या रागातून जावयाकडून सासूवर प्राणघातक हल्ला

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Kangana Ranaut : स्मृती इराणींच्या मासिक पाळीसंदर्भातील ‘त्या’ विधानावर कंगना रणौतनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!