Pune News

Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

374 0

पुणे : पुण्यातल्या कसबा पेठेतील शेख सलाउद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेकडून आज कारवाई (Pune News) करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरामध्ये रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रात्रीच्या सुमारास मोठा जमाव या ठिकाणी जमला होता. त्यामुळे आज सकाळपासून पोलिसांनी या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे.

महापालिकेने दर्ग्याला काही बांधकाम करण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यानंतर या बांधकामाला महापालिकेने स्टॉप वर्कचे आदेश दिले होते. असं असताना त्याठिकाणी काही बांधकाम करण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पालिकेने यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. मात्र शुक्रवारी वाढत्या विरोधामुळे ही कारवाई थांबवण्यात आली होती.

शुक्रवारी पुण्यातील कसबा पेठेतल्या शेख सल्लाह दर्ग्याभोवतीच अतिक्रमण हटवण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात येणार होती. त्यासाठी सुमारे दीड हजार पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र मुस्लिम समाजाकडून या कारवाईला विरोध दर्शवण्यात आला. अतिक्रमण कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं जनसमुदाय दर्गा परिसरात गोळा झाला होता. अखेर ही कारवाई थांबवण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!