Pune News

Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव

283 0

पुणे : पुणे मेट्रो सुरक्षा रक्षक (Pune News) विकास बांगर याने प्रसंगावधान राखत 3 वर्षांच्या मुलाचे व त्याच्या आईचे प्राण वाचवले. काल दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2.22 मिनिटांनी सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानक येथे फलाट क्रमांक 2 वरून एक 3 वर्षाचा मुलगा खेळतांना रुळावर पडला. त्यावेळी कामावर असणाऱ्या सुरक्षारक्षकाने मुलाला ट्रॅक वर पडताना पहिले. पडणाऱ्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाची आई देखील रुळांवर पडली.

त्यावेळी प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षक विकास बांगर याने फलाटावरील आपत्कालीन मेट्रो थांबविण्याचे प्लंजर (ई.एस.पी) बटन वेळीच दाबले.त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी वेगाने येणाऱ्या मेट्रो ट्रेन त्वरित थांबल्या. यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ 30 मीटर इतके होते. मेट्रो ट्रेन थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप रित्या रुळांवरून बाहेर काढण्यात आले व परिवाराशी त्याची भेट करून देण्यात आली.

सुरक्षारक्षक श्री. विकास बांगर यांच्या समयसूचकतेबद्दल आणि धाडसी कार्याबद्दल पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे (प्रशासन व जनसंपर्क), महाव्यवस्थापक सोमेश शर्मा (वित्त) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी स्थानक नियंत्रक व पुणे मेट्रोचे कर्मचारी उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…

Kishori Pednekar : रोहित पवारांनंतर आता किशोरी पेडणेकर यांना ED चे समन्स

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Ratnagiri News : रत्नागिरीमध्ये जिलेटीनचा मोठा साठा जप्त; एकाला अटक

Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स

Ram Mandir : राममंदिर सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण व निमंत्रण गृहसंपर्क अभियानास विक्रमी प्रतिसाद

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

Rohit Sharma : हिटमॅन रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये केले ‘हे’ 5 महारेकॉर्ड

ATS : रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 जणांना घेतले ताब्यात

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!