Pune News

Pune News : अक्षयतृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण

331 0

पुणे : आज अक्षय तृतीया, साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला आजचा दिवस खूप शुभ आणि मंगल समजला जातो. अक्षयतृतीयेच्या या मंगलदिनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या , लाडक्या गणरायाभोवती आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर मंदिरावर फुलांनी आंब्याची प्रतिकृती देखील साकरण्यात आली. तसेच प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंतगी रंगीबेरंगी फुलांनी डोळ्यांना सुखावाणारी सजावट साकरण्यात आली. पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला.अशा या मंगलमय वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली.आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानंतर आंब्याचा हा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. मंदिरात केलेली ही आंब्याची आरास पाहण्यासाठी तसेच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया या दिवसाचं हिंदू धर्मीयांमध्ये विशेष महत्त्व आहे. आजच्या दिवशी दिलेलं दान अक्षय्य असतं म्हणजेच कधीच क्षय न होणारं असं मानून दान धर्म करण्याची रीत आहे. पाणी, मडकं दान ते अगदी सोनं खरेदी अशा विविध गोष्टी आज केल्या जातात. भारतामध्ये दानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सणांमधूनही ही वृत्ती जोपासण्यासाठी आजचा अक्षय्य तृतीयेचा दिवस विशेष आहे. मान्यतांनुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान केल्याने ते अक्षय आणि पुण्यकारक असते. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आज दानधर्म करू शकता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Mumbai-Pune Express : मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!