Pune News

Pune News : गीता धर्म मंडळातर्फे भव्य गीता पाठ महायज्ञाचे यशस्वी आयोजन!

828 0

पुणे : गीता धर्म मंडळ पुणे (Pune News) या संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आज दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी गीतापाठ महायज्ञ आयोजित केला होता. या महायज्ञामध्ये संपूर्ण जगभरातून दहा हजार आठशे साधक प्रत्यक्ष सहभागी झाले होते. या सर्व साधकांनी संपूर्ण श्रीमद् भगवद्गीतेचे 18 अध्याय एक सुरात सलग गायले. या साधकांमध्ये अडीच हजार साधकांचे गीता अध्याय कंठस्थ होते.

यावेळी सर्व साधकांचे स्वागत करताना गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार यांनी आज या मैदानावर भक्ती सागर उसळून आलेला आहे असे सांगितले. गीता धर्म मंडळातर्फे हा पहिलाच प्रयत्न असून तो सर्व साधकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण यशस्वी झाला आहे असे त्यांनी नमूद केले.एका ठिकाणी एका वेळेला दहा हजार पेक्षा जास्त साधकांनी गीता पठण करणे हा एक विक्रम असून आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे असे आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या डॉक्टर चित्रा जैन यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते अध्यक्ष प्राचार्य डॉ. मुकुंद दातार, कार्यवाह विनया मेहेंदळे, सहकार्य वाह प्राचार्य मुकुंद कोंढवेकर, शताब्दी महोत्सव संयोजक ह भ प मोरेश्वर बुवा जोशी आणि इतर सर्व पदाधिकारी यांना आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सन्मानचिन्ह देण्यात आले.

या उपक्रमास पुणे पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार, उपायुक्त श्री संदीप गिल, डॉ. देगलूरकर, प्रा. मेधा कुलकर्णी, हेमंत रासने, प्रदीप गारटकर, अभय माटे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली.कार्यवाह विनया मेहेंदळे यांनी सर्वांचे आभार मानले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

मध्यप्रदेश, राजस्थानात काँटे की टक्कर; कल हाती यायला सुरुवात

Prerna Tuljapurkar : प्रेरणा पुष्कर तुळजापूरकर यांची भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती

Telangana Election Result : महाराष्ट्र जिंकायला निघालेल्या ‘राव’ यांच्यावर तेलंगणा गमावण्याची वेळ?

Mumbai Fire News : मुंबईत गिरगावमध्ये भीषण आग; 2 जणांचा मृत्यू

Maharashtra Politics : निवडणुकीचा निकाल 4 राज्यांचा ! धक्का मात्र ठाकरे गटाला

Congress : काँग्रेसच्या पराभवाला ‘या’ चुका ठरल्या कारणीभूत; 1980 नंतर उत्तर भारतात सत्ता मिळवण्यात पहिल्यांदाच अपयश

तीन राज्यातील विजय ही लोकसभा विजयाची नांदी-धीरज घाटे

Ladli Behna Scheme : मध्य प्रदेशच्या निवडणुकीत ‘लाडली बहना’ योजना ठरली ट्रम्प कार्ड

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!