पुणे : पुण्यातून (Pune News) एक मोठी बातमी समोर आली आहे. मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदरांची 125 कोटींची फसवणूक करणाऱ्या विनोद खुटेवर कारवाई करण्यात आली आहे. ईडीने व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने विनोद खुटे यांची 38 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी करत बँकेतील 23 कोटींची रक्कम सुद्धा गोठवली आहे. खुटे याने काना कॅपिटलच्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून 125 कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप तपास एजन्सीने केला आहे. खुटे फसवणूक करुन दुबईत फरार झाला आहे.
गुंतवणूक योजनांचे आमिष दाखवून फसवणूक
पुणे शहरात विनोद खुटे याने धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तयार केली. त्याने गुंतवणुकदारांना चांगल्या व्याजाचे आमिष दाखवले. इतर ठिकाणी मिळत असलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज दिले. यामुळे असंख्य गुंतवणूकदारांनी त्याच्या पतपेढीत मोठी गुंतवणूक केली.ही गुंतवणूक त्याने हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाच्या बाहेर पाठवली. पोलिसांनी या प्रकरणी विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पीतांबर अनारसे, अजिंक्य बदाधे आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pratibha Patil : माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल