Aaba Bagul

Pune News : काँग्रेस नेते आबा बागुल फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

384 0

पुणे : पुण्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते आबा बागुल हे फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत. काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज होते. आबा बागुल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे पुण्याची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर हा काँग्रेस आणि रवींद्र धंगेकरांसाठी मोठा धक्का मानला जाईल.

Share This News
error: Content is protected !!