Pune Crime

Pune News : पोलीस दारात दिसताच माफियाचा हार्ट अटॅकने मृत्यू

539 0

पुणे : मागच्या काही महिन्यांपासून पुणे पोलिसांनी (Pune News) गुन्हेगारांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्स विक्रीचा कारखाना आणि वितरणाचे जाळे उधवस्त केल्यावर आता पेडलरकडे आपला मोर्चा वळवला आहे. समर्थ पोलीस ठाग्याच्या हद्दीत छापा टाकताना एका पेडलरला पोलिसांना पाहून हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

पेहलर असे मृत पावलेल्या माफियाचे नाव आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे, त्याच्यावर पूर्वी ड्रग विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. सर्च ऑपरेशन दरम्यान तो नाना पेठेतील घरी असल्याची खबर मिळाली.यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांना दारात पाहून त्याला हार्ट अटॅक आला आणि तो दारातच कोसळला. पोलिसांनी आगि घरच्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तेथे काही ग्रॅम ड्रग सापडले. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vakrasan : वक्रासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!