Weather Update

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

301 0

मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसानं (Weather Update) झोडपून काढलं आहे, पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं आज आणि उद्या पुणे शहरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शहरातील अनेक भागात संध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तर मुंबईबाबत बोलायचे झाल्यास हवामान विभागाकडून मुंबई शहर, पालघर आणि ठाण्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिवसभर उष्णतेची लाट राहील मात्र सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अशंतः ढगाळ आकाश असून सांयकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide