पुणे : मुंबईतील सहा जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक यंत्रणेकडून महत्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ठाणे शहर, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने ठाणे व पालघर लोकसभा मतदारसंघात सोमवारी मतदान होणार आहे. पुणे, कोकण, गोवा, बाजूकडून येणाऱ्या वाहनाचा मुंबई व गुजरातच्या दिशेने वाहनाचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामार्फत वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार पुणे-मुंबई द्रुतगतीवर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिशेने प्रवास करू नये
वाहतुकीबाबतच्या अधिसूचनेनुसार, दिनांक 20/5/2024 रोजी सकाळी 06.00 वा. पासून ते 24:00 वाजेपर्यंत या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी (पार्क) करण्यास पूर्णत: बंदी राहील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
वाहतूक नियंत्रण अधिसूचनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश नसल्याने जड अवजड वाहनांनी (दि. 20)रोजी 06.00 वाजता पासून 24.00 वाजेपर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिशेने प्रवास करू नये, अशी सूचना जारी करण्यात आली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाला न्यायालयाने ‘या’ अटी व शर्तींवर दिला जामीन
Pune News : दोघांचा नाहक बळी घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला अखेर जामीन मंजूर
Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
Loksabha : महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान
Pune News : पुण्यात प्रसिद्ध बिल्डर्सच्या मुलाचा कारनामा; भरधाव कार चालवत दोघांना उडवलं
Pune Crime : पुणे हादरलं ! प्रेयसीने संपर्क तोडल्यावर आरोपीने बहिणीवर केला गोळीबार
Mansoon Update : ‘या’ भागात मान्सून दाखल, हवामान विभागाकडून देण्यात आली माहिती
Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य
Prataprao Bhosale : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
Pune News : पुण्यात आलिशान कारने दिलेल्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू; कल्यानीनगर मधील घटना
Pune Blast : गॅस चोरी करताना झाला भीषण स्फोट; चाकण-शिक्रापूर परिसर हादरला!