आज देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. महागाईतून दिलासा मिळणार का ? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला होता. त्यानुसार अर्थसंकल्पात काही गोष्टी स्वस्त झाल्या तर काही महाग झाल्या. मात्र या अर्थसंकल्पातून पुणेकरांना मोठा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोला 814 कोटी रुपये मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी
दोन मार्गांवरील पुणे मेट्रो सुरू झाली असून या मेट्रोचे आणखी काही काम बाकी आहे. मेट्रोचे जाळे संपूर्ण शहरभरात पसरवण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून उर्वरित कामांसाठी पुणे मेट्रोला 814 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या प्रकरणी पुण्याचे खासदार आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
या पोस्टमध्ये मुरलीधर मोहोळ यांनी लिहिले आहे की, ‘मोदी सरकारकडून पुणे मेट्रोसाठी 814 कोटी मिळाले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी 814 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून यामुळे पुण्यात मेट्रोचे जाळे विस्तारण्यास गती येणार आहे. पुण्याच्या विकासाच्या बाबतीत मा. मोदीजींनी गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिला असून या निधीचा ओघ कायम ठेवला आहे. याबद्द्ल समस्त पुणेकरांच्या वतीनं मोदी सरकारचे मनःपूर्वक धन्यवाद!’
पुणे मेट्रोला मिळालेल्या या निधीमुळे सोयी सुविधांनी सुसज्ज अशी पुणे मेट्रो पुणेकरांच्या सेवेत येणार आहे. मात्र प्रत्यक्षरीत्या मेट्रोचे जाळे संपूर्ण शहरात कधी विसरणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.