पुणे : पुण्यात (Pune News) एक धक्कादायक घटना घडली आहे. सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण असल्याने निसर्ग चांगलाच फुलला आहे. त्यामुळे अनेक पर्यटक तलाव, धबधबे याठिकाणी पर्यटनासाठी जात असतात. यादरम्यान मावळ (Pune News) तालुक्यातील कुंडमळा धबधबा येथे पर्यटनासाठी आलेल्या एका तरुणाचा पाय घसरला आणि तो वाहून गेला आहे. ओंकार गायकवाड असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
Pan Aadhaar Link : पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार आता ‘एवढा’ दंड
काय आहे नेमके प्रकरण?
ओंकार गायकवाड असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असून तो टाटा मोटर्स या कंपनीत कामाला होता. पुणे जिल्ह्यात (Pune News) मावळ तालुक्यातील आंबी परिसरात ही घटना घडली आहे. यावेळी धबधब्यावर पर्यटनाचा आनंद घेत असताना अचानक ओंकारचा पाय घसरला आणि तो वाहून गेला. वाहून गेलेल्या ओंकारचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. कुंडमळा धबधब्यावर फिरायला गेल्यावर बाळगलेली निष्काळजी त्याच्या जीवावर बेतली आहे.
Bus Accident : ठाण्यात एसटी आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात; 2 जण जखमी
कुंडमाळ धबधब्यावरील व्हिडिओ ठरला शेवटचा, पिकनिकला आलेला तरुण वाहून गेला pic.twitter.com/CQYhMbDkDq
— Anish Bendre (@BendreAnish) July 8, 2023
ओंकार गायकवाड हा त्याच्या मित्रांसोबत वर्षा विहारासाठी कुंडमाळ धबधबा येथे आला होता. सेल्फी काढण्यासाठी तो पाण्याच्या प्रवाहात उभा राहिला मात्र त्याचा पाय घसरला आणि तो वाहत्या पाण्यासोबत वाहून गेला. तो वाहून जाण्याच्या (Pune News) अगोदरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच मावळ वन्यजीव रक्षक टीम, स्थानिक ग्रामस्थ आणि आंबी एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ओंकारचा शोध सुरु आहे.