Pune Koyta Gang

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

691 0

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात मागच्या काही वर्षांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुण्यात कोयता गॅंगची (Pune Koyta Gang) दहशत अजूनही पाहायला मिळत आहे. यामध्ये नमाज पठणासाठी आलेल्या एका तरुणावर काही टवाळखोर पोरांनी कोयत्याने वार केले. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजत आहे. पोलीस CCTV च्या मदतीने आरोपींचा शोध घेत आहेत.

आरोपीना वारंवार समज देऊनदेखील या घटना काही कमी होताना दिसत नाही आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या आरोपींना जरब बसावा म्हणून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र तरीदेखील या घटना कमी होताना दिसत नाही. या घटनेमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशाच काही घटना याअगोदरदेखील पुण्यात घडल्या आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी पुण्यातील वडगाव शेरीत कोयता व तलवारसह दोन टोळीमध्ये हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे हा सगळा प्रकार त्या ठिकाणी असलेल्या महिला पोलिसांसमोर घडला होता.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!