PUNE KONDHAWA CASE: कोंढवा प्रकरणातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल, पोलिस नेमकी काय कारवाई करणार?

114 0

PUNE KONDHAWA CASE: पुण्यातील कोंढवा परिसरात कथित बलात्काराचा खळबळजनक आरोप करणाऱ्या तरुणीविरोधात आता पोलिसांनीच कारवाई केली आहे. खोटी फिर्याद देऊन पोलिसांची दिशाभूल (PUNE KONDHAWA CASE) केल्याचा आरोप तिच्यावर असून, याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

HISTORY OF BABA BHIDE BRIDGE PUNE : अखेर बाबा भिडे पूल खुला होणार; भिडे पुलाचा नेमका इतिहास काय ?

पुण्यातील कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये २ जुलै रोजी कथित बलात्काराची धक्कादायक फिर्याद एका तरुणीने दिली होती.तिच्या म्हणण्यानुसार, कुरिअर बॉयच्या वेशात आलेल्या आरोपीने तिच्यावर बलात्कार केला होता.
तसेच तिचे छायाचित्र काढून ब्लॅकमेल केल्याचे आरोपही करण्यात आले होते.मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण, मोबाईल संवाद, आणि छायाचित्रांचा तपास करताच धक्कादायक सत्य समोर आले.आरोपी हा कोणताही अज्ञात व्यक्ती नसून, तरुणीचाच ओळखीचा मित्र असल्याचे स्पष्ट झाले.या दोघांमध्ये परस्पर संमतीने संवाद आणि छायाचित्रे घेण्यात आली होती.

TOP NEWS MARATHI :PUNE PARVATI POLICE AND ACCUSED VIDEO: पुण्यात खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडतानाचा सिनेस्टाईल थरार

इतकेच नव्हे तर, त्या छायाचित्रांमध्ये फेरबदल करून तरुणीने खोटा संदेश तयार केला आणि बनावट पुरावे तयार करत पोलिसांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही दिशाभूल केली.या प्रकरणात पोलिसांनी ५०० पोलीस कर्मचारी, २५० हून अधिक ठिकाणच्या फूटेज तपासली, पण अखेरीस सगळी फिर्याद खोटी असल्याचे निष्पन्न झाले.यानंतर पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणीविरोधात भारतीय दंड संहिता कलम २१२, २१७, २२८, २२९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सध्या हा गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा असला तरी न्यायालयाच्या परवानगीने यामध्ये दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे.या तरुणीची मानसोपचारतज्ज्ञांकडून तपासणीही करण्यात आली असून, खोटी फिर्याद का दिली याचा तपास पुढे केला जाणार आहे.

Share This News
error: Content is protected !!