PUNE HOSPITAL FIRE AUDIT: पुण्यातील महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांचं फायर ऑडिट करणार

PUNE HOSPITAL FIRE AUDIT: पुण्यातील महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांचं फायर ऑडिट करणार

236 0

PUNE HOSPITAL FIRE AUDIT:  पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांनी शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर ते चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले..

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागाला दिलेत PUNE HOSPITAL FIRE AUDIT:

PUNE HOSPITAL FIRE AUDIT: पुण्यातील महापालिकेच्या आणि खाजगी रुग्णालयांचं फायर ऑडिट करणार
पुणे महापालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवल किशोर राम यांनी सोमवारी महापालिकेतील विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला..

तरी प्रत्येक विभागाच्या विभाग प्रमुखांनी त्यांच्यासमोर संबंधित विभागाच्या कामकाजाचं सादरीकरण केलं..

सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून त्याचे प्रश्न सोडवण्यावर भर असणार असल्याचाही त्यांनी सांगितले..
‘रुग्णालयांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जात नसल्याने आग लागणे, अपघात होण्याचे प्रकार घडतात.

Ravan Gang GANG Videos: पिंपरी-चिंचवडमध्ये रावण गॅंगचा हैदोस

या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांनी आवश्यक नियमांचे पालन करून सुरक्षिततेच्या दृष्टिने त्याची पूर्तता केली आहे का? याची तपासणी होणे गरजेचे आहे.

यासाठी महापालिकेचे रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयाचे 100 टक्के फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.

VAISHNAVI HAGWANE CASE: सासू, नणंद आणि नवऱ्याच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ; कोर्टात नेमकं काय घडलं?

ज्या रुग्णालयांमध्ये नियमांची पूर्तता होत नाही, हे समोर येईल, त्यांना टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी रुग्णालयांना दिलाय..
‘दैनंदिन कामात न अडकता शहराच्या आणि नागरिकांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरतील, अशा योजना सुरू करण्यावर आपला भर राहणार आहे.

केवळ महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या माध्यमांतून माहिती घेऊन नागरिकांच्या फायद्यासाठी उपक्रम राबविले जाणार आहेत.

असंही महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटले..

 

Share This News
error: Content is protected !!