PUNE FIRING NEWS:  पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत. कारण केवळ 24 तासांच्या आत पुण्यामध्ये गोळीबाराच्या (PUNE FIRING NEWS) दोन घटना घडल्यात.

PUNE FIRING NEWS: पुण्यात 24 तासात दोन ठिकाणी “ढिश्क्याव”;पुणे पोलीस काय करतायेत ?

126 0

PUNE FIRING NEWS:  पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत.

कारण केवळ 24 तासांच्या आत पुण्यामध्ये गोळीबाराच्या (PUNE FIRING NEWS) दोन घटना घडल्यात.

आणि विशेष म्हणजे या दोन्ही घटना पुणे पोलिसांच्या झोन-तीन अंतर्गत घडल्या आहेत.

त्यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्न निर्माण केले जात आहेत.‌PUNE FIRING NEWS:

KOTHROOD POLICE GIRL CASE: पोलिसांकडून ‘त्या’ मुलींना कोणतीही मारहाण नाही
येथील पहिली घटना उत्तम नगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.

या परिसरात 5 तरुण एका ठिकाणी मोबाईलवर “पबजी” खेळत होते.

त्यावेळी त्यातील एकाने मित्रांना दाखवण्यासाठी परवाना नसलेलं बेकायदेशीर पिस्तूल आणलं होतं.

JALNA KALYANI VAYAL CASE: मित्राच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून कल्याणी वायाळ या तरुणीने संपवलं जीवन

हे पिस्तूल पहात असताना एका तरुणाकडून चुकून गोळी सुटली. ही गोळी त्यातीलच एका तरुणाच्या गुडघ्याच्या खालील भागाला चाटून गेली.

त्यानंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि पोलिसांना हा घडलेला प्रकार समजला.

तर दुसरीकडे काल रात्री सिंहगड रोडच्या कोल्हेवाडी परिसरात घडली. अभिजीत चव्हाण नावाचा बिल्डर कारने जात असताना ट्रॅफिक असल्यामुळे सिद्धार्थ जाधव नावाच्या तरुणाची दुचाकी कारला घासली गेली.

त्यावरून दोघांनीही आपापल्या मित्रांना बोलावलं.

Beed News : गोट्या गित्तेने मुंबईत रेकी करून जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ल्याचा रचला कट? – विजयसिंह बांगरांचा आरोप

काही वेळ वाद आणि हाणामारी ही झाली. त्यानंतर मात्र साहिल चव्हाण नावाच्या तरुणाने गावठी पिस्तुलातून दोन राऊंड फायर केल्या.

या दोन्ही घटनांमुळे उत्तम नगर आणि सिंहगड रोडच्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.

दरम्यान या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले असून सविस्तर माहिती झोन 3 पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!