आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणी 3 हजार 800 पानांच दोषारोप पत्र न्यायालयात दाखल

247 0

पुणे – आरोग्य भरती परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं तब्बल 3 हजार 800 पानांचे दोषारोप पत्र शिवाजीनगर न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 20 आरोपींच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य भरतीतील गट क आणि गट ड च्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. यामध्ये आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. महेश बोटले आणि प्रशांत बडगिरे मुख्य आरोपी आहे. या दोन्ही पेपरफुटीमध्ये पुणे सायबर पोलिसांकडून वडझरीचे सानप बंधू यांचा शोध सुरु आहे. आतापर्यंत पोलिसांनी केवळ संजय शाहुराव सानप यांना जेरबंद केलं आहे.

या प्रकरणात काही दिवसांपूर्वीच आणखी एका म्होरक्याला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अतुल प्रभाकर राख ( रा.थेरला ह.मु. अंकुशनगर कपिल मुनी मंदिराच्या पाठीमागे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी अतुल हा अटक केलेला आरोपी संजय सानपाचा मेहुणा आहे.

पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलीसांना हवा असलेला मुख्य आरोपी जीवन सानप याच्या सर्व अ‍ॅक्टीव्हीटी अतुल राख करायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडून या प्रकरणातील अनेक गोष्टींचा उलगडा होही अशी आशा पोलिसांना आहे.

Share This News

Related Post

Fraud

Fraud News : लष्करात भरती करण्याच्या आमिषाने तरुणांना 29 लाखांचा गंडा

Posted by - June 23, 2023 0
पुणे : पुण्यामधून फसवणुकीचे (Fraud News) एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये लष्करी गणवेश घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे…

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन (व्हिडिओ)

Posted by - January 27, 2022 0
पुणे- ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट (वय 78) यांचं पुण्यात राहत्या घरी निधन झालं. आज दुपारी त्यांच्या…
Pune Sinhagad Road Accident

Pune Sinhagad Road Accident : डंपरखाली येऊनही महिला थोडक्यात बचावली; पुणे सिंहगड रोडवरील घटना

Posted by - July 28, 2023 0
पुणे : पुणे शहरातील सिंहगड रोडवर एक अपघात झाला आहे. सिग्नल ओलांडताना डंपरने एका महिलेलं उडवले आहे. ही महिला झेब्रा…
Sindhudurga News

Sindhudurg News : कुटुंबावर दु:खाचा डोंगर ! सकाळी पाणी सोडायला गेला; अन्..

Posted by - September 19, 2023 0
सिंधुदुर्ग : आज महाराष्ट्रात सगळीकडे गणपतीचा सण साजरा केला जात आहे. यादरम्यान सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg News) एक धक्कादायक घटना घडली आहे.…
Pune PMC Water Supply News

Pune Water : पुण्यातील पाणीकपातीसंदर्भात घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - February 24, 2024 0
पुणे : पुणेकरांसाठी (Pune Water) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. आज उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *