पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. महिला मुलींवरील अत्याचाराचं प्रमाण देखील वाढलं आहे. अशात पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील स्वारगेट बस आगारातील शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणीला बळजबरीने बसमध्ये नेण्यात आले. आणि तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आले. ही सर्व घटना मंगळवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. पीडित तरुणी ही स्वारगेटवरुन फलटणला जात होती. तेव्हा आरोपींनी तरुणीला फलटणला जाणारी बस आहे असं सांगून दुसऱ्या बसमध्ये जायला सांगितले. तिथेच तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपीचे वय 36 वर्षे इतके असून त्याच्यावर शिक्रापूर इथे गुन्हे दाखल आहेत. आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असं असून तो जामिनावर सुटलेला आरोपी आहे. आरोपीच्या शोधासाठी आठ पथके रवाना झाली आहेत. स्वारगेट परिसरात नेहमी वर्दळ असते. मात्र मंगळवारी रात्री उशिरा या परिसरातील गर्दी कमी झाल्यानंतर हा प्रकार घडल्याच सांगण्यात येतंय. रात्री महिला शिवशाही बसच्या जवळून जात असताना तिला आरोपीने बळजबरीने आत ओढून घेतले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांत वाढ होत असताना या प्रकारामुळं पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपासदेखील पोलिस करत आहेत.