Pune Crime

Pune Crime News : क्रूर कृत्याने पुणे हादरलं ! मित्राची हत्या करून व्हिडिओ केला व्हायरल

514 0

पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune Crime News) मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. यामध्ये तरुण पिढीदेखील गुन्हेगारीमध्ये अडकत चालली आहे. पुण्यतील चाकणमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांनी अल्पवयीन मित्राचीच हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे दगडाने ठेचत हत्या करतानाचा त्यांनी व्हिडीओ ही बनवला आणि तो इन्स्टाग्रामच्या स्टेटसवर ठेवला. या अल्पवयीन मुलांची ही क्रूरता पाहून परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसानादेखील मोठा धक्का बसला आहे.

काय घडले नेमके?
चाकणमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ही घटना घडली आहे. काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. शाब्दिक चकमकीतून सुरू झालेला वाद एवढा वाढला की त्याचे नंतर हत्येत रूपांतर झाले. मृत अल्पवयीन मुलावर चार महिन्यांपूर्वीच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर हत्या करणाऱ्यांपैकी एकावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाकण पोलिसांनी या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीसह अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतलेलं आहे.

मृत मुलगा, मुख्य आरोपी अन तिसरा साथीदार तिघे मद्यपान करत होते. त्यावेळी मृत मुलगा आणि तिसऱ्या मित्रात शाब्दिक चकमक झाली. यातून मृत तरुणाने त्याच्या कानशिलात लगावली. हे पाहून मुख्य आरोपी संतापला आणि त्याने मृत तरुणाची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर त्यांनी हत्येचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओच्या आधारे चाकण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Gaganyaan Mission Astronauts : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘या’ 4 जणांची निवड; पंतप्रधान मोदींनी केली घोषणा

Abdu Rozik : बिग बॉस फेम अब्दू रोझिकला ED कडून समन्स

Pune News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या अडचणींमध्ये वाढ ! ‘त्या’ वक्तव्याची SIT चौकशी होणार

Pune News : पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! ड्रग्सनंतर अवैध 9 हजार लिटर दारू जप्त

Maharashtra Budget 2024 : अजित पवार मांडणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प!

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ दोन शिलेदारांनी सोडली साथ

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!