BHIWANDI NEWS:

Pune Crime News : चारित्र्याच्या संशयातून गळा दाबून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

1159 0

Pune Crime News : पुणे: पिंपरीतून धक्कादायक घटना समोर आली असून चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime News) परंतु पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पतीला रुग्णालयात दाखल केले.
शरद रूपचंद चितळे (वय ३५, रा. रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

TOP NEWS MARATHI : तरुणांनो, सावधान!ऑनलाइन जुगारात त्यानं 90 लाख रूपये, 6 एकर जमीन, 2 तोळे सोनं फुकलं

त्याने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. त्यांना सहा वर्षांची एक मुलगी आहे. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्याने १३ एप्रिल रोजी पत्नीचा गळा दाबून खून केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Pune Crime News)

यानंतर शरद याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत. शरद याला रुग्णालयात दाखल केले. पत्नीला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तर शरद याला निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Pune Crime News)

बाळासाहेबांचे विचार आम्हाला चोरांनी सांगण्याची गरज नाही- आदित्य ठाकरे

याबाबत महिलेचा मृत्यू हे गळा दाबून झाला. असा वैद्यकीय अधिकारी अभिप्राय व पोस्टमार्टम रिपोर्ट दिला.
शरद यांना १८ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पत्नीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी शरद आणि त्यांच्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. चौकशी दरम्यान शरद याने लघुशंकेचा बहाना केला. आणि पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात गेला. आणि त्याने दरवाजा आतून कडी लावून बंद केला. पोलिसांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला असता शरद चितळे याने फरशी पुसण्याचे लिक्विड पिल्याचे निदर्शनास आले.

यावेळी पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने शरद याला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!