पुण्यात (PUNE CRIME NEWS) एक अत्यंत संतापजनक घटना घडली. लग्नाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंड सोबतचे शरीर संबंधांचे व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड केल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली
पुण्यातील (PUNE CRIME NEWS) एका 24 वर्षीय तरुणी सोबत एक अत्यंत धक्कादायक आणि विश्वासघातकी प्रकार घडला… या तरुणीचे एका 27 वर्षे तरुण विनय शिरीष कुलकर्णी राहणार फुलेवाडी रिंगरोड सोबत प्रेम संबंध होते
TOP NEWS MARATHI: गर्लफ्रेंडकडून लग्नास नकार अन् बॉयफ्रेंडने केले ‘ते’ व्हिडिओ व्हायरल;
तरुणीने लग्नास नकार दिल्याने तरुणाने त्यांच्या शरीरसंबंध वेळी चोरून काढलेले व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड केले. काही वेळा तसे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर या तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणी एका प्रतिष्ठित कंपनीत मॅनेजर या पदावर कार्यरत आहे. त्यांना आरोपी हा एक कंपनीत ऑटोमोबाईल इंजिनियर आहे.
दोन वर्षांपूर्वी त्यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या दरम्यान, दोघांच्या संमतीने त्यांचे शारीरिक संबंध झाले. याच वेळी आरोपीने तरुणीला कोणतीही कल्पना न देता तिचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ चोरून काढले.
काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांचे संबंध तुटले आणि तरुणीने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर जवळपास एक वर्षापासून दोघांमध्ये कोणताही संपर्क नव्हता.जेव्हा पीडित तरुणीच्या एका मैत्रिणीला एका पॉर्न वेबसाइटवर तिचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ दिसला.
आपली मैत्रीण अशा अवस्थेत इंटरनेटवर पाहून तिला मोठा धक्का बसला आणि तिने तातडीने पीडित तरुणीला याबद्दल माहिती दिली. हे सत्य समजताच पीडित तरुणी पूर्णपणे हादरून गेली.
हा संपूर्ण प्रकार 30 डिसेंबर 2023 ते 12 मे 2025 या दरम्यान घडला आहे.
पुण्यात प्रेमाला काही काळीमा फासणारी एक घटना 30 डिसेंबर 2023 ते 12 मे 2025 या दरम्यान घडली.
एक नामांकित कंपनीत मॅनेजर पदावर काम करणाऱ्या तरुणीने लग्नास नकार दिल्याने तिचा प्रियकर विनय शिरीष कुलकर्णी याने तिच्या सोबतचे शरीर संबंध ठेवतानाचे चोरून काढलेले व्हिडिओ पॉर्न साईटवर अपलोड केल्याने मोठी खळबळ उडाली.
त्या संपूर्ण प्रकरणामुळे तरुणीला मोठा धक्का बसला असून,या तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून अलंकार पोलीस ठाण्यात या नराधम प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात अलंकार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकचा तपास करत असून या प्रकरणात आणखी कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
BEER PRICE DECREASE: बिअर प्रेमींसाठी खुशखबर! 200 ची बिअर आता 50 ला मिळणार
PUNE POLICE LAND SCAM: वाघोली जमीन घोटाळा प्रकरण, पोलीस निरीक्षकासह चार जणांवर गुन्हा दाखल