Bengaluru Cafe Blast

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

480 0

पुणे : काही दिवसांपूर्वी बंगळुरूमध्ये भीषण स्फोट झाला होता. या प्रकरणात आता महत्वाची बातमी समोर आली आहे. या स्फोटाचं पुणे कनेक्शन (Pune News) समोर आलं आहे. बंगळुरू स्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासासाठी एनआयएचं पथक तातडीने पुण्यात दाखल झाले आहे.

काय घडले नेमके?
बंगळुरूमधील रामेश्वर कॅफेमध्ये एक मार्च रोजी हा स्फोट झाला होता. जुन्या विमानतळ रोडजवळ कुंडलहल्ली परिसरात हा कॅफे आहे. दुपारी नेहमीप्रमाणे या कॅफेमध्ये जेवणासाठी मोठी गर्दी होती. पण त्यावेळी अचानक सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, काही कर्मचारी दूर फेकले गेले. कॅफेमधील साहित्याचं प्रचंड नुकसान झालं. अचानक झालेल्या स्फोटात 10 जण जखमी झाले होते.

दरम्यान आता या स्फोटाच पुणे कनेक्शन समोर आलं आहे. बंगळुरू स्फोटातील संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणाला आहे. एनआयएचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. सध्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!