Pune Rain News

पुणे शहराला रेड अलर्ट! खडकवासल्यातून विसर्ग वाढवला; ‘या’ ठिकाणी शिरले पाणी

77 0

पुण्यात आठ-दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गेले तीन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही पुणे शहराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील सगळीच धरणे भरली असून या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात आहे. काल दिवसभरातही दोन ते तीन तासाच्या अंतराने खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात आला. काल रात्री 35000 क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याने पुण्याच्या काठांवर वसलेल्या विविध वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली. त्यामुळे आज सकाळपर्यंत बऱ्याचशा भागांमध्ये पाणी शिरले आहे.

पुण्यातील सिंहगड रोडवर असलेल्या एकता नगरी, निंबज नगर, डेक्कन परिसरातील पुलाची वाडी, मंगळवार पेठेतील भीम नगरचा काही भाग या ठिकाणी पाणी शिरायला रात्रीपासूनच सुरुवात झाली आहे. याबाबत काल सायंकाळपासून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. भोंग्यावरून सूचनाही देण्यात येत होत्या. त्या अनुषंगाने नागरिकांनी खबरदारी घेतली आहे.‌ नदीपात्रालगत असलेली कालच वाहने आणि जनावरे काढून घेतली असून नदीपात्रात कोणीही उतरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या खडकवासला धरणातून मोठा नदीमध्ये 35000 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. मात्र आज दिवसभरात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो.

या सगळ्या दरम्यान कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने संपूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. अग्निशमन दल देखील सज्ज आहे. मात्र 35 हजार क्युसेकने पाणी सोडल्यास आमच्या घरांमध्ये याआधी कधीही पाणी शिरत नव्हते अशी तक्रार पूर्वाधित नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर नदीपात्रात नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या साठी करण्यात आलेल्या बांधकामामुळे आणि राडा रोडा असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली असून हा पूर मानवनिर्मित असल्याचे आरोप पर्यावरण तज्ञांकडून आणि रहिवाशांकडून केले जात आहेत.

Share This News

Related Post

ओझर येथील विघ्नहर उद्यानाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - June 19, 2022 0
  पुणे:- विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ओझर येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व जेष्ठाना विरंगुळा मिळावा यासाठी साकारण्यात…

Dagdusheth Ganapati : ‘दगडूशेठ’ गणपतीची श्री हनुमान रथातून थाटात मिरवणूक; RSS चे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना

Posted by - September 19, 2023 0
पुणे : जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषासोबतच जय श्रीराम, जय श्रीराम च्या नादघोषात श्री हनुमान रथातून…
Pune Traffic News

Pune Traffic News : पुण्यातील राजाराम पूल चौकातील वाहतुकीत होणार बदल

Posted by - November 25, 2023 0
पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे (Pune Traffic News) काम युद्धपातळीवर सुरू असून, सध्या या कामामुळे रांका ज्वेलर्स ते ब्रम्हा हॉटेलपर्यंत…

#PUNE : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर तरुणाचा अंत विजेचा धक्का लागून नाही ! महावितरण अहवालानुसार …

Posted by - March 21, 2023 0
पुणे : ओपन जिममध्ये व्यायाम केल्यानंतर फोनवर बोलत असताना तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. अमोल शंकर नाकते (वय २१ वर्ष) या…

इच्छुकांनो तयारीला लागा! महापालिकांसाठी 29 जुलैला आरक्षण सोडत

Posted by - July 23, 2022 0
ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळं रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय. यासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *