PUNE BIBWEWADI NEWS |
विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेलं पुणे शहर आता गुन्हेगारांचं शहर बनलंय का? असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा गुन्हेगारीच्या घटना पुण्यात सातत्यानं घडताना पाहायला मिळतात.
अशातच आता पुण्यातील अप्पर इंदिरानगर परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीवारांना पुणे शहर हादरला आहे नेमकं काय प्रकरण आहे? PUNE BIBWEWADI NEWS |
पुण्याच्या याच अप्पर इंदिरानगर भागात कोयते नाचत दहशत वाजवण्याचा प्रकार ताजं असतानाच आता केवळ गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून गोळीबार करण्यात आलाय सुदैवाने गोळीबारात कुणीही जखमी नाही. गोळीबारानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. गोळीबार करणाऱ्या 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गणेश भालके आणि देवा डोलारे असे गोळीबार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातल्या बिबवेवाडीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
गाडीला कट लागल्याच्या कारणावरून दोघांनी हवेत गोळीबार केला. मध्यरात्री गोळीबाराचा आवज ऐकून बिबवेवाडीमधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली.
मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.
MEDHA PATKAR: भीमनगरच्या रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देऊन न्याय द्यावा
आरोपी आणि फिर्यादी दोघेही दुचाकीवरून जात होते. फिर्यादीच्या दुचाकीला आरोपीच्या दुचाकीचा धक्का लागला. याच रागातून या दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर आरोपीने हवेत गोळीबार केला.
CHHAGAN BHUJBAL : माजी मंत्री छगन भुजबळ यांना मागितली 1 कोटीची खंडणी; नेमकं प्रकरण काय?