Pune Airport Drug Seizure: Narcotics Worth ₹2.61 Crore Seized at Pune International Airport; Brought by Passenger from Bangkok

Pune Airport Drug Seizure: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर २.६१ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; बँकॉकचे प्रवाशी घेऊन आले आणि पुढे

76 0

Pune Airport Drug Seizure: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क आयुक्त कार्यालयाच्या हवाई गुप्तचर युनिटने (AIU) मोठी कारवाई करत (Pune Airport Drug Seizure) अंमली पदार्थांची तस्करी उधळली आहे. गुरुवारी रोजी झालेल्या या कारवाईत, अधिकाऱ्यांनी तब्बल ५.२३ किलो वजनाचे ‘मेथाक्वलोन’ हे अंमली पदार्थ जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या अंमली पदार्थाची किंमत सुमारे ₹ २.६१ कोटी इतकी आहे. या प्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

GANGWAR IN PUNE: सुसंस्कृत कोथरूडमध्ये गुंडांच्या टोळ्या आणि गुन्हेगारी का वाढली ?

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-241 विमानाने बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशावर अधिकाऱ्यांचा संशय बळावला. या (Pune Airport Drug Seizure) प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता, त्यात पांढऱ्या रंगाची पावडर आणि स्फटिकांच्या स्वरूपात काही पदार्थ आढळून आले. त्वरित केलेल्या चाचणीत, हा पदार्थ ‘मेथाक्वलोन’ असल्याचे निष्पन्न झाले. हे एक सायकोट्रॉपिक औषध असून, ‘नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ऍक्ट, १९८५’ अंतर्गत यावर बंदी आहे.

NASHIK POLICE CASE: नाशिकमध्ये अपहरणाचा व्हिडिओ व्हायरल, 24 तासांत आरोपी अटकेत!

जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे वजन ५,२३४.७० ग्रॅम असून, ते तातडीने ताब्यात घेण्यात आले. (Pune Airport Drug Seizure)अधिकाऱ्यांनी संबंधित प्रवाशाला अटक केली असून, यामागे कार्यरत असलेल्या संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या मोठ्या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

BANJARA RESERVATION HINGOLI MORCHA: बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या

Share This News
error: Content is protected !!