Pune News

Pune News : गणपतीच्या डेकोरेशनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

366 0

पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये गणपतीसाठी केलेल्या सजावटीच्या विद्युत रोषणाईमुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. गणेशोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने शॉक लागून रात्री झोपेत असतानाच तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

काय घडले नेमके?
खेड तालुक्यातील खरपुडीत घरगुती गणपती सजवटीच्या विद्युत रोषणाईत शॉटसर्किट झाल्याने शॉक लागून तरुणाचा रात्रीच्या झोपेत होरपळून मृत्यू झाला. खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक या ठिकाणी ही घटना घडली आहे. वैभव जगन्नाथ गरुड (वय 35 ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खरपुडी येथील दत्तनगरमध्ये मयत वैभव गरुड हे कुंटुंबासह राहत होते. गरुड यांनी घरात गणपती बसवून मूर्तीसमोर आकर्षक सजावट केली होती. या सजावटीमध्ये इलेक्ट्रिक लाईटच्या माळा लावण्यात आल्या होत्या. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात लावलेल्या इलेक्ट्रिक लाईटच्या माळांमध्ये शॉटसर्कीट होऊन आग लागली. यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. यानंतर घरातील साड्या व इतर वस्तू जळून खाक झाल्या. त्यावेळी गादीवर झोपलेल्या वैभव गरुड यांचा जळून मूत्यू झाला. आगीमुळे त्यांना घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. वैभव हा सर्पमित्र म्हणून खेड तालुक्यात प्रसिद्ध होता.

Share This News

Related Post

दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न निष्फळ, एसटी उलटली, सासवड जवळील घटना

Posted by - April 7, 2023 0
पुरंदर तालुक्यातील झेंडेवाडी आरटीओ कॉर्नर जवळ दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात राज्य परिवहन मंडळाची बस उलटली. या अपघातात एका मोटरसायकल स्वाराचा…
Nashik News

Nashik News : संतापाच्या भरात लिव्ह-इन पार्टनरकडून महिलेची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 17, 2023 0
नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) आरोपीने संतापाच्या भरात आपल्या लिव्ह…
Bank Fraud

Bank Fraud : राज्यातील ‘या’ बँकेतील घोटाळा उघड; ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण

Posted by - March 31, 2024 0
बुलाढाणा : बुलाढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नांदुरा अर्बन बँकेला कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानेच (Bank Fraud) तब्बल…
Pimpri Chinchwad News

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग; एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

Posted by - August 30, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड मधील (Pimpri Chinchwad News) चिखली भागात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास…

पंतप्रधानांच्या पुणे दौरा पार्श्वभूमीवर काळे कपडे घालून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

Posted by - March 6, 2022 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *