सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक सुजित पटवर्धन यांचं निधन

209 0

पुणे: सार्वजनिक वाहतुकीचे अभ्यासक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुजित पटवर्धन यांचे आज शनिवारी (दि.23 ऑक्टोबर) पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे.त्यांच्यामागे पत्नी दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

सुजित पटवर्धन हे व्यवसायाने प्रिंटर होते. इंग्लंडमध्ये प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा अभ्यास करुन ते पुण्यात परतले. नारायण पेठेत त्यांनी मुद्रा ही प्रिंटिंग प्रेस स्थापन करुन त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला होता.पुणे शहर व पिंपरी चिंचवड मधील सार्वजनिक वाहतूक सक्षम व्हावी, यासाठी ते गेली २ दशक प्रयत्नशील होते.

सायकल ट्रॅक, बीआरटी, पदपथ, नदी सुधार या विषयावर त्यांनी काम केले.शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी त्यांनी १९८० मध्ये परिसर संस्थेची स्थापना केली.

Share This News
error: Content is protected !!