PRANJAL KHEWALKAR CHAT : खेवलकरांच्या "ऐसा माल चाहिये" या मेसेज नेमका अर्थ काय?

PRANJAL KHEWALKAR CHAT : खेवलकरांच्या “ऐसा माल चाहिये” या मेसेज नेमका अर्थ काय?

173 0

डॉ. प्रांजल खेवलकर (PRANJAL KHEWALKAR) या नावाची सध्या राज्यात कुठल्याही नेत्यापेक्षाही जास्त चर्चा आहे. कारण आहे अर्थातच पुण्यात झालेली ड्रग्स पार्टी… आणि त्यावर पोलिसांनी मारलेला छापा.. याच ड्रग्स पार्टी प्रकरणात काल एक मोठी अपडेट समोर आली. खेवलकर यांनी इतर एका आरोपीला एका मुलीचा नाचतानाचा व्हिडिओ पाठवून “ऐसा माल चाहिये” असा मेसेज केला.. याच मेसेजमुळे खेवलकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

डॉ. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींच्या फोनची पुणे पोलिसांकडून फॉरेनसिक तपासणी सुरू आहे. गेल्या तीन-चार दिवसांमध्ये खेवलकर हे कसे निर्दोष आहेत आणि त्यांना राजकीय षडयंत्राच्या आडून कसं अडकवलं जातंय याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. पुणे पोलिसांनी केलेले बरेचसे दावे फोल ठरले. काल कोर्टात झालेल्या सुनावणीतही पोलीस त्यांची बाजू मांडण्यात कमी पडल्याची टीका होत आहे. त्यातच पोलिसांनी ड्रग्सच्या तीन वेगवेगळ्या पुड्या पंचनामा करताना एकत्र केल्या. त्या एकत्र नेमक्या का केल्या ? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांकडेही नव्हतं. पोलिसांनी सुरुवातीला न्यायालयात खेवलकरांवर पूर्वीचे गुन्हे असल्याचं म्हटलं मात्र त्यांच्यावर कोणतेही गुन्हे नसल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात असताना आता पोलिसांच्या तपासातून समोर आलेलं महत्त्वपूर्ण चॅट खेवलकरांना अडचणीत आणण्यासाठी पुरेसं ठरू शकतं. खेवलकर यांनी याच प्रकरणातील एका पुरुष आरोपीला एका मुलीचा नाचतानाचा व्हिडिओ पाठवला होता. या व्हिडिओ खाली “ऐसा माल चाहिये” असं लिहिलं होतं. त्यामुळे त्यांनी माल हा शब्द प्रयोग नेमका कशासाठी केला ? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आजकाल अनेकदा टवाळखोर पुरुषांकडून मुलींचा- महिलांचा उल्लेख “माल” म्हणून केला जातो. तसेच ड्रग्स खरेदी- विक्री आणि सेवन करणारे कोड लैंग्वेजमध्ये ड्रग्सला “माल” म्हणतात. त्यामुळे खेवलकरांना अपेक्षित असलेला माल म्हणजे महिला की ड्रग्स याचा अंदाज बांधणं कठीण आहे. पण हा शब्द कशासाठीही वापरला गेला असला तरीही तो चांगल्या गोष्टीसाठी वापरला गेला असण्याची शक्यता क्वचितच आहे. दुसरीकडे त्यांच्या या चॅटची चर्चा होऊ लागल्यानंतर त्यांच्या जुन्या पार्ट्यांचे व्हिडिओ देखील नव्याने व्हायरल होत आहेत. पेशाने डॉक्टर असलेले खेवलकर हे म्युझिक आणि फिल्म प्रोड्यूसर असल्याने त्यांचे हायप्रोफाईल मित्रांंबरोबर, सेलिब्रिटीं बरोबर पार्ट्या करत असतात. त्यांच्या या पार्ट्यांमध्ये मद्य, हुक्का सर्रास दिसून येतो. खेवलकर हे पार्ट्यांचे शौकीन असल्याचं दिसतं. मात्र पार्ट्या करणं हा काही कायद्यानं गुन्हा नाही. पण या पार्ट्यांमध्ये तुम्ही नेमकं काय करता ? यावर तुमच्यावर कारवाई होणार की नाही हे ठरतं.

आरोपींचे वकील काय म्हणाले ?

खेवलकर यांना कोणता माल हवा होता यावर आरोपीच्या वकिलांना विचारलं असता माल हा शब्दप्रयोग कशासाठी ही केला जाऊ शकतो. व्यावसायिक सुद्धा माल घ्यायला चाललोय असं म्हणतात.. त्यामुळे खेवलकर यांनी हा शब्द कशासाठीही वापरलेला असू शकतो. तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. हा या केसशी संदर्भात विषयच नाही, असा आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय. मात्र वकील काहीही म्हणाले तरीही पोलीस मात्र या माल शब्दाच्या मागचा अर्थ शोधण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर खेवलकर यांच्या मोबाईल लॅपटॉप मधून आक्षेपार्ह गोष्टी आढळल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. हे आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ आणि चॅट पोलिसांकडून आरोप पत्र दाखल करताना कोर्टात सादर केले जातील आणि कोर्टाला खरंच त्यात काही चुकीचं वाटलं तर मात्र खेवलकर यांच्या अडचणीत वाढ होईल हे नक्की. तर दुसरीकडे आज खेवलकर यांच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्ज केला जाणार आहे. त्यामुळे जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

 

Share This News
error: Content is protected !!