पूजा खेडकर हिने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्या संदर्भात तिने पोलिसांत तक्रार देखील दिली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असतानाच जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे देखील खेडकर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत.
पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयात पूजा खेडकर ही आयएएस पदाचे प्रशिक्षण घेत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी तिची छेड काढल्याचा आरोप तिने केला होता. दिवसे यांनी आपल्याला त्यांच्या रूममध्ये बोलावले होते, मात्र मी नकार दिल्यामुळे दिवसे संतापले आणि त्यामुळेच त्यांच्या सांगण्यावरून यूपीएससीने माझ्यावर गुन्हा दाखल केला असल्याचा आरोप देखील पूजा खेडकर ने तिच्या वकिलांमार्फत केला आहे. दरम्यान दिवसे यांनी छळ केल्या प्रकरण चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी तीन वेळा समन्स बजावले मात्र तरी देखील पूजा खेडकर हजर झाली नाही. दरम्यान, पुण्यातून पूजा खेडकरची बदली वाशिमला झाली. त्यानंतर तिने तिथे जिल्ह्याधिकारी दिवसे यांच्याविरोधात छळ केल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, पूजाने दिल्लीच्या कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे.
त्यामुळे आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. या भीतीनेच ती अनेक दिवसांपासून फरार आहे. पूजा ही परदेशात पळून गेल्याची चर्चा देखील सुरू आहे. दरम्यान तपास यंत्रणांकडून तिचा शोध सुरू आता जिल्हाधिकारी सुहास दिवसे देखील तिच्या विरोधात दावा ठोकणार असल्याने तिच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.