पुणे- पुणे महानगरपालिकेमध्ये विविध विभागामध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांनी आज, बुधवारी महापालिकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन केले. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेमध्ये विविध ठेकेदारांमार्फत कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये सुमारे ६ ते ७ हजार कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी आज, बुधवारी महापालिकेसमोर जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले.
पालिका अधिकाऱ्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकर मान्य कराव्या अन्यथा या आंदोलनाचं स्वरूप आणखी तीव्र होईल असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिला.
काय आहेत कामगारांच्या मागण्या
पगार वेळेत मिळावा
गणवेश व सुरक्षा साधने मिळावीत
रजा व सणांच्या सुट्या मिळाव्यात
ठेकेदार बदलला तरी कामगारांची सेवा अखंडित ठेवावी
इएसआयसी कार्ड मिळावे