पिंपरी- चिंचवड महापालिका देणार तृतीय पंथीयांना पेन्शन, काय आहेत त्याचे निकष ?

423 0

पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असलेले व ज्यांचे ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा तृतीयपंथी व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून दरमहा ३ हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतला आहे.

तृतीय पंथीयांना पेन्शन देणारी पिंपरी चिंचवड महापालिका देशातील पहिली महापालिका ठरली आहे. समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उत्थानासाठी त्यांच्या जीवनमानावर दुरगामी सकारात्मक परिणाम करणारी ही तृतीयपंथी पेन्शन योजना असल्याचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी या योजनेबद्दल माहिती देताना सांगितले आहे .

तृतीयपंथीयांना सन्मानाने जगता यावे यासाठी राज्य सरकारने विविध योजना हाती घेतल्या आहेत. तसेच महानगरपालिकाही कार्यक्षेत्रात रहाणाऱ्या तृतीय पंथीयांसाठी उपक्रम राबवित आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!