पॅरा ऑलिंपिकवीर सचिन खिलारीला ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस

280 0

पुणे :पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत गोळा फेक मध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून देणाऱ्या सचिन खिलारीला युवा उद्योजक व श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन ग्रुप’कडून पाच लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर याच स्पर्धेत या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या संदीप सरगरला दोन लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती खिलारी आणि सरगर यांच्या हस्ते झाली. यावेळी पुनीत बालन यांनी ही घोषणा केली. ‘पुनीत बालन ग्रुप’कडून विविध खेळांच्या विविध स्पर्धांबरोबर खेळांडूना प्रोत्साहन दिले जाते. अनेक खेळांडूना आर्थिक मदतही केली जाते.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत कांस्य पदक मिळविणाऱ्या स्वप्निल कुसळेला ११ लाखांचे बक्षीसही ‘पुनीत बालन ग्रुप’कडून देण्यात आले. पॅरिसमध्ये पार पडलेल्या पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत सिल्वर मेडल विजेत्या सचिन खिलारी आणि भाला फेक स्पर्धेत कांस्य पदकाने हुलकावणी दिलेल्या संदीप सरगर यांना प्रोत्साहान देण्यासाठी पुनीत बालन यांनी अनुक्रमे ५ व २ लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे.

यावेळी दोन्ही खेळाडूंनी पुनीत बालन यांचे आभार मानले तर या खेळाडूनी आगामी काळात चांगली कामगिरी करून भारत देशाला पदके मिळवून द्यावीत, अशी प्रार्थना पुनीत बालन यांनी श्री. गणरायाकडे केली.

Share This News

Related Post

पुणे मेट्रोचा संपूर्ण पहिला टप्पा मार्च 2023 पर्यंत पूर्ण होण्याचा पालकमंत्र्यांना विश्वास

Posted by - December 2, 2022 0
पुणे : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट…
Maratha Reservation Protest

Maratha Reservation Protest : पुण्यात मराठा आंदोलकांनी मुंबई- बंगळुरू महामार्ग रोखला; वाहतूक पूर्णपणे ठप्प

Posted by - October 31, 2023 0
पुणे : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. राज्यात काही ठिकाणी या आंदोलनाला…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना

Posted by - May 21, 2024 0
पुणे : पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

सर्वज्ञानी संजय राऊत जी, उत्तर द्याल का ? ; पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा सवाल

Posted by - February 27, 2022 0
शिवसेना खासदार  संजयजी राऊत यांनी महापौर  मुरलीधरजी मोहोळ यांच्यावर अग्रलेखातून  ‘पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत’.…

मालवाहू ट्रकला अपघात; अग्निशमन दलाकडून दोघांची सुटका

Posted by - March 5, 2023 0
पुणे:  अग्निशमन दल नियंत्रण कक्षात मुंबई-बेंगलोर हाइवे, सुस खिंड, महिंद्रा शोरूम समोर दोन मालवाहू ट्रकचा अपघात झाला असून त्यामधे दोन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *