अन्यथा… ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा 

373 0

छत्रपत्री संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या हिंदी सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अभिनेता विकी कौशल हा संभाजी महाराज यांच्या मुख्य भूमिकेत तर अभिनेत्री रश्मिका मंदाना ही महाराणी येसूबाई यांच्या मुख्य भूमिकेत दिसून आली आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर शिवप्रेमींनी ट्रेलरमधील काही सीन्सवर आक्षेप घेतला आहे. विकी कौशल हा लेझीम खेळताना दाखवण्यातआला आहे. लेझीम खेळताना दाखवणं चुकीचं नाही मात्र लेझीमवर नृत्य करताना दाखवणे चुकीचे आहे. असं संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरमधील आक्षेपार्ह सीन्स वरून पुण्यात लाल महल जवळ मराठा क्रांती मोर्चाने आंदोलन केलं.छावा चित्रपटातील काही दृश्यांना मराठा क्रांती मोर्चाचा विरोध आहे. दृश्य वगळा अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे. छावा हा चित्रपट एका मराठी माणसाने निर्मित केला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. छावा चित्रपटाचा ट्रेलर हा अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर चित्रपटातील आक्षेपार्ह सीन्स बदलणार का ? यावर ते काय प्रतिक्रीया देणार हे पाहणं महत्वाचं राहील.

Share This News
error: Content is protected !!