पुणे शहराला पुन्हा “ऑरेंज अलर्ट”; पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

262 0

पुणे शहरातील घाटमाथ्यांवर आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात नैऋत्य मोसमी वारे पुन्हा सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा नैऋत्य मौसमी वारे सक्रिय होणार असल्यामुळे शुक्रवारपासून पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे वीकेंड्सला बाहेर फिरण्यासाठी, ट्रेकिंग साठी जाणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर घाटमाथ्यावर जाणे टाळावे, असा इशाराही देण्यात आला.

पुण्यासह सातारा, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, कोल्हापूर, पालघर, आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट

ऑरेंज अलर्ट- पुणे, सातारा, ठाणे, रायगड, रत्नागिरी

येलो अलर्ट- मुंबई, मुंबई उपनगर, नाशिक, कोल्हापूर, पालघर, सिंधुदुर्ग

विजांच्या गडगडाटासह पाऊस- गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, भंडारा-गोंदिया, वर्धा, नागपूर

Share This News
error: Content is protected !!