पुणे : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी मोदींवर निशाण साधला आहे. बारामतीत जाऊन मोदींनी स्वत: शरद पवार माझे गुरू आहेत, आणि त्यांचं बोट धरून पुढे जातो असं म्हटले होते, असा टोला दानवे यांच्याकडून यावेळी लगावण्यात आला.
नेमके काय म्हणाले दानवे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना दानवे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. बारामतीत जाऊन मोदींनी स्वत: शरद पवार माझे गुरू आहेत, आणि त्यांचे बोट धरून पुढे जातो असं म्हटले होते. अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता त्यांनाच सत्तेत घेतलं असं दानवे यांनी म्हटलं आहे.
यावेळी अंबादास दानवे यांनी मराठा आरक्षणावरदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण हा जनतेच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. जेव्हा हे आरक्षण कोर्टात गेल तेव्हा हेच फडणवीस म्हणाले होते की, आमचं सरकर येऊद्या मराठ्यांना आरक्षणाचा लाभ देऊ. आता केंद्रात आणि राज्यात यांचं सरकार आहे. केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवली तर समाजाला आरक्षण मिळेल असं दानवे यांनी म्हटलं आहे.