पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी एकाला अटक

480 0

पुणे: सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेन्टर च्या गैरव्यवहार प्रकरणी आज पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मध्ये ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने आज दिला भाजप नेते डॉ किरीट सोमैय्यानी हा घोटाळा उघडकीस आणला होता. सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे पार्टनर असल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला होता.

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार ही केली होती. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर कोविड सेन्टर मध्ये ३रुग्णांचा मृत्यू झाला होता डॉ सोमैय्या यांच्या तक्रारीनंतर पुणे महानगरपालिकेने तसेच PMRDA ने सदर कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली होती

Share This News
error: Content is protected !!