CHANDRASHEKHAR BAWANKULE: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (CHANDRASHEKHAR BAWANKULE) यांच्या पुढाकाराने बारामती शहराच्या
सांस्कृतिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला आहे.
CHANDRASHEKHAR BAWANKULE FULL SPEECH: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं भाषण
मौजे बारामती येथील श्री. सावतामाळी सभागृहाच्या बांधकामासाठी आवश्यक असलेली
508 चौरस मीटर शासकीय जमीन बारामती नगरपरिषदेला (BARAMATI NAGARPALIKA) कब्जेहक्काने (भोगवटादार वर्ग-२) प्रदान करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
सिटी सर्वे क्रमांक 90 आणि129 मधील एकूण 508चौरस मीटर जमीन नगरपरिषदेला विनामूल्य न देता,
चालू बाजारमूल्य वसूल करून हस्तांतरित केली जाणार आहे.
यामुळे शासनाला आर्थिक उत्पन्न मिळेल आणि नगरपरिषदेला सभागृह बांधकामासाठी आवश्यक जागा उपलब्ध होईल.
ELECTRIC BOND MAHARASHTA : महाराष्ट्रात कागदी बॉंड्सची झंझट संपुष्टात! ई-बॉंड प्रणालीचे युग सुरू
या जमीन हस्तांतरणासोबत शासनाने काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “श्री. सावतामाळी सभागृहाच्या बांधकामामुळे बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल.
हा प्रकल्प शहराच्या विकासात मोलाची भर घालेल.”