‘सकल हिंदू समाज’च्या वतीने रविवारी हिंदू जनआक्रोश मोर्चा

565 0

पुणे:  सकल हिंदू समाजच्या वतीने येत्या रविवारी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे, श्री. शंभू चरित्राचे अभ्यासक नीलेश भिसे, मातृशक्तीच्या नलिनी वायाळ, विश्‍व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, शिव समर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे, शिव प्रतिष्ठानचे संजय पासलकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पवळे म्हणाले, ‘या मोर्चाची गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. हा मोर्चा अभूतपूर्व असा होईल. शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे या मोर्चात सहभागी होणार आहेत. मोर्चात महिला आणि युवकांचा लक्षणीय सहभाग असेल. सकल हिंदू समाजाच्या ताकदीचे या निमित्ताने दर्शन होणार आहे. तेलंगाणाचे आमदार राजा भैया, तुकाराम महाराजांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई यांचा विशेष सहभाग असणार आहे.’

भिसे म्हणाले, ‘धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावेत व त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.’

यावेळी बोलताना धीरज घाटे म्हणाले, ‘रविवारी (२२ जानेवारी) सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाची सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने मोर्चा डेक्कन परिसरातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल.’

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!