पुण्यात नव्यानं उप-टपाल केंद्राची निर्मिती; आंबेगाव बुद्रुक मध्ये उप टपाल कार्यालय सुरू

466 0

पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील वाढते नागरीकरण व त्या भागातील नागरिकांच्या वाढत्या मागणीस प्रतिसाद देऊन भारतीय टपाल खात्यातर्फे नवीन आंबेगाव बुद्रुक उपटपाल कार्यालय सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणी गोवा परिमंडळाचे चीफ पोस्टमास्टर जनरल श्री अमिताभसिंग यांच्या हस्ते आंबेगाव बुद्रुक उपटपाल कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी पुणे क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाये, डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस मिस. सिमरन कौर व पुणे शहर पश्चिम विभागाच्या प्रवर अधीक्षक श्री बी पी एरंडे, विलास घुले सिनियर पोस्ट मास्तर पुणे सिटी हेड ऑफिस, भूषण देशमुख साह्यक अधीक्षक, सौ कीर्ती जाधव साह्यक अधीक्षक, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गुरव,आदी उपस्थित होते.

नवीन आंबेगाव बुद्रुक उप टपाल कार्यालयाचा पिनकोड ४११०७३ असून आंबेगाव बुद्रुक ब्रांच टपाल कार्यालयाचे नवीन आंबेगाव बुद्रुक उपटपाल कार्यालयामध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.

नवीन आंबेगाव बुद्रुक उपटपाल कार्यालयात इंडिया पोस्ट पेमेंट बँक खाते, महिला सम्मान बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना व इतरही पोस्ट ऑफिस बचत बँकेच्या योजना यांचा लाभ घेता येणार आहे. तसेच स्पीड पोस्ट, ई –बुकिंग, पार्सल इत्यादी बुकिंग सुविधेसह आधार नोंदणी व अद्यतन सेवा ही उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे. या कार्यालयाची वेळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ असून सेव्हिंग बँक व इतर काउंटरच्या कामकाजाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.

या पूर्वी कात्रज उपटपाल कार्यालयास (४११०४६) जोडलेला भाग म्हणजेच खंडोबा मंदिर, संतोष नगर, संतोषी माता मंदिर, आदर्श कॉलोनी, राज टॉवर्स, महावीर कुंज, सूर्योदय सोसायटी, दुर्गा हिल, अंजनी नगर, अय्यप्पा मंदिर, गंधर्व लान्स, शुभारंभ कॉलोनी, जैन मंदिर, भोलेनाथ मंदिर, राधा कृष्ण कॉलोनी, चक्रदर स्कूल, शिवांजली गल्ली, भोलेनगर, इंद्रायणी नगर, अमृत सिटी, दत्त निवास, जय कॉम्प्लेक्स, साई हॉस्पिटल, दत्त विहार, श्री विठल हेरीटेज, टेलको कॉलनी, तुकाराम नगर, शिवगोरक्ष मठ, सन BRIGHT स्कूल, रेलीकॉन गार्डन, वेताळ नगर, मार्बल लाईन, ह्मय रेसिडेन्सी, आंबेगाव बुद्रुक गावठाण, स्टार बझार, तुकाराम नगर, सप्ठ्श्रुंगी सोसायटी, वसुंधरा, विवा सरोवर, जांभूळवाडी गाव,आशा फाउंडेशन, बालाजी ग्रीन पार्क, कोलेवाडीगाव, आंबेगाव खुर्द, मेघस्पर्श, लेक orchid, लेक वूड, स्वामी नारायण मंदिर,लेक विस्टा, ई. भाग आता नवीन आंबेगाव बुद्रुक टपाल कार्यालयाला जोडण्यात आलेला आहे.
तरी या भागात राहणाऱ्या नागरिकांनी आंबेगाव बुद्रुक टपाल कार्यालयास भेट देऊन आपल्या भागाचा पिनकोड तपासून घ्यावा व आपल्या संबंधिताना नवीन पिनकोड कळवावा जेणेकरून नागरिकांना येणारे टपाल विनाविलंब पोहचू शकेल, असे आवाहन करण्यात येत आहे.
टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच आंबेगाव बुद्रुक भागातील नागरिक मोठ्या संख्येने आंबेगाव बुद्रुक टपाल कार्यालयात उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!