मोदींच्या दौऱ्यात राष्ट्रवादी ताकदीनं विरोध करणार – प्रशांत जगताप

270 0

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ‘पानिपत’ होणार आहे. याची चाहूल लागताच भाजपच्या वतीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाचारण करण्यात आले आहे. भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान केला असून आता पालिकेतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरचा कार्यक्रमही मोजक्या माणसांच्या उपस्थितीत घेण्याचा त्यांचा मानस आहे. हा शिवद्रोह आहे.

त्यामुळे येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधानांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  तीव्र निषेध करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला आहे.

जगताप म्हणाले, अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची एकही संधी स्वतः नरेंद्र मोदींनीही सोडली नाही. छत्रपतींच्या महाराष्ट्राने देशाला कोरोना दिला असे वक्तव्य करत त्यांनी छत्रपतींच्या स्वराज्याचा अवमान केला. संघाचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अवमान केला.

ही ‘छिंदम’ प्रवृत्ती भाजप आणि आरएसएस च्या नसानसांत भिनलेली आहे. असे असतानाही मतांचे राजकारण करण्यासाठी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा आवर्जून वापर भाजपकडून होतो.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!