मुंबई : पुणे हिट अँड रन केस सध्या देशभर मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 2 पोलीस अधिकारी निलंबित झाले असून ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक झाली आहे. अशातच आरोपीला मदत केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवर अजित पवार गटाचे युवक काँग्रेस अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी टीका केली होती.ही टीका अंजली दमानिया यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातुन एक मोठी मागणी केली आहे.
काय केली मागणी?
आज प्रचंड राग आला आहे. तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात? आज मला त्या सूरज चव्हाणने “रीचार्जवर काम करणारी बाई” म्हटले? मला? मी काय आहे, आणि किती सिद्धांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा? का? त्यांना राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता? मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांच्याकडून लिखित स्वरुपात माफी हवी आहे. असले थर्ड ग्रेड स्टेटमेंट्स आणि त्यांची मेंटालिटी त्यांनी त्यांच्या खिश्यात ठेवावी. मला इतर महिला राजकारण्यांची प्रतिक्रिया पण हवी आहे. कारण असली थर्ड ग्रेड भाषा राजकारणात पूर्ण पणे थांबलीच पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
अजित पवार @AjitPawarSpeaks
आज प्रचंड राग आला आहे.
तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात ?
शी।
आज मला त्या सूरज चव्हाण ने
“रीचार्जवर काम करणारी बाई” म्हटले ?
मला ? मी काय आहे, आणि किती सिधांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 29, 2024
काय म्हणाले होते सुरज चव्हाण
अंजली दमानिया यांनी केलेल्या मागणीवर राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया यांची नार्को टेस्ट करा. अंजली दमानिया कुणाच्या सांगण्यावरून ही मागणी करतात. त्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या नाहीत तर ही रिचार्जवर चालणारी बाई आहे, असे म्हणत सूरज चव्हाण यांनी हल्लाबोल केला आहे. तर दमानिया बाईंना सुपारी मिळाली की त्या मागे लागतात. त्यांचा सीडीआर सरकारने तपासावा अशी माझी सरकारकडे मागणी आहे. दमानिया कुणाच्या फायद्यासाठी आरोप करतात हे तपासलं पाहिजे? अशी शंकादेखील सुरज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Monsoon News : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून?
Pune Crime News : फोटो मॉर्फींग करून अल्पवयीन मुलाची बदनामी; आरोपीवर गुन्हा दाखल
Pune Fire : पुण्यातील कमला नेहरू पार्क जवळील इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाच्या 3 गाड्या दाखल
Dr Ajay Taware : ब्लड फेरफार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेले डॉ. अजय तावरे नेमके कोण आहेत?
Pune Porsche Car Accident : डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांचे निलंबन
HDFC Bank Alert :एचडीएफसी बँकेने UPI व्यवहारांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Sangli Accident : ‘तो’ वाढदिवस ठरला अखरेचा ! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत
Crime News : धक्कादायक ! ‘या’ भाजप उमेदवाराच्या ताफ्याने 3 जणांना उडवलं