पुणे- शिवाजीनगर येथील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
नराधम आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व मुलींच्या सुरक्षेत दिरंगाई करणाऱ्या संस्थाचालक व प्राचार्य यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते, उदय महाले, निलेश निकम, महेश हांडे, श्वेता मिस्त्री, अमृता थोरात, वेणू शिंदे, सानिया झुंजारराव आदी सहभागी झाले होते.