येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करणार आहेत. दरम्यान पुण्यात येणारे नरेंद्र मोदी हे तिसरे पंतप्रधान ठरणार आहेत.पंतप्रधान मोदी यांचं 6 मार्च रोजी सकाळी 10 वाजून 30 मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे.त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर पंतप्रधानांची उपस्थिती गरवारे महाविद्यालय येथील मेट्रोस्टेशनवरुन पंतप्रधान आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत.
मेट्रो उद्घाटनानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोठी सभा होईल. एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावरील सभेनंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरने ते लवळे येथील कार्यक्रमाला रवाना होतील.
लवळे येथील कार्यक्रम समाप्त होताच दुपारी 3 च्या सुमारास लोहगाव विमानतळावरून पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होतील. दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर आता नरेंद्र मोदी हे पुणे महापालिकेत येणारे दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत.महापालिका भवनात होणारा त्यांचा नियोजित कार्यक्रम काही मिनिटांचाच असला, तरी देशाच्या पंतप्रधानांनी या भवनास भेट देण्याचे प्रसंग दुर्मीळ आहेत.
तसेच चंद्रशेखर, पी. व्ही. नरसिंह राव, एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग या पंतप्रधानांनी पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी भेटी दिल्या आहेत.