दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा 41 व्या वर्धापन दिनानिमित्त संगीत महोत्सवाचं आयोजन

527 0

 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या 41 वर्धापन दिनानिमित्त नू.म.वि. प्रशालेच्या प्रांगणात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे.

 

ड्रम,डफ,घुंगरू,शंख यांसह विविध वाद्यांवर नाद उमटवीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारे वादन सादर करताना प्रख्यात ड्रम वादक, शिवमणी, रूना रिझवी शिवमनी, पंडित रविचारी व सहकाऱ्यांनी पुष्पांजली स्वरमैफिलीन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट च्या संगीत महोत्सवाचा प्रारंभ झाला झाला. या महोत्सवाचे उद्घाटन पुणे पोलिसायुक्त अमितेश कुमार, पद्मश्री शिवमणी यांच्या हस्ते झालं. यावेळी परिमंडल एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!