पिंपरी चिंचवडमध्ये नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

894 0

पिंपरी- पिंपरी चिंचवड शहरात चिखली परिसरातील हरगुडे वस्तीमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

लक्ष्मण देवासी बाबूलाल आदिवासी असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी लक्ष्मणच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

रविवारी दुपारपासून लक्ष्मण देवासी बेपत्ता झाला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह चिखली परिसरातील एका बंद पडलेल्या पत्र्याच्या घरामध्ये आढळून आला. लक्ष्मण याच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. चिखली पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!