pune mumbai nagpur devendra fadnavis raj thakarey ajit pawar

महानगरपालिका निवडणुका अंतिम टप्प्यात;प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यभर राजकीय घडामोडींना वेग

67 0

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असून सायंकाळी ५.३० वाजता प्रचाराची मुदत संपणार आहे. पुणे (PUNE) मुंबई(MUMBAI)नागपूर (NAGPUR) डोंबिवली आणि जळगावसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये निवडणुकीची चुरस शिगेला पोहोचली आहे. मतदानासाठी काही तासच उरले असताना पुणे, डोंबिवली आणि जळगावमध्ये जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे.

पुणे महानगरपालिकेच्या(PMC) १६३ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या सांगता दिनी पुण्यात प्रमुख नेत्यांचे दौरे होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(DEVENDRA FADNAVIS) आज पुण्यात जाहीर सभा घेणार असून भाजपची भूमिका ठामपणे मांडणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार(AJIT PAWAR)शहरात भव्य रोड शो करत शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(RAJ THACKAREY)सध्या पुण्यात असून त्यांच्या भेटीगाठींमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील(PUNE)मतदान प्रक्रियेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शहरात १२ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. ईव्हीएम आणि मतपेट्यांच्या वाहतुकीसाठी १,०५६ पीएमपी बस सज्ज करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मकोका अंतर्गत अटकेत असलेला गजानन मारणे याला मतदानासाठी दोन दिवस पुण्यात येण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे.

नागपुरातही(NAGPUR) प्रचाराचा जोर कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADNAVIS) नागपुरात दुचाकीवरून रोड शो करणार असून हा रोड शो इतवारी भारत माता चौक ते महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत होणार आहे. या माध्यमातून भाजप आपला बालेकिल्ला मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Share This News
error: Content is protected !!