MEDHA KULKARNI BANNER : कोथरूडच्या बाई’ म्हणत मेधा कुलकर्णी विरोधात बॅनर लावणं ठाकरे गटाला भोवलं

61 0

MEDHA KULKARNI BANNER: भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली.. त्यांच्या या मागणीनंतर राजकारण ढवळून निघालं. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात टीका करणारे बॅनर्स लावले होते.. बॅनर्स लावणारे कार्यकर्त्यांवर गुन्हा (MEDHA KULKARNI BANNER)  दाखल करण्यात आला..

पुण्यात भाजप पदाधिकाऱ्याकडून महिला पोलीसाचा विनयभंग CCTV व्हायरल; अटक का नाही ?

भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव अशी मागणी केली..छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक करण्याचे काम थोरले बाजीराव पेशवे यांनी केलं.. शनिवार वाडा देखील त्याचेच प्रतीक आहे.. हिंदवी साम्राज्याचा विस्तार, मराठा साम्राज्याचा विस्तार जसा छत्रपतींच्या काळात झाला.. तसेच कार्य थोरले बाजीराव पेशवे यांनी देखील केलं.. या कामात बाजीराव पेशवे यांचं देखील योगदान मोठे आहे.. थोरले बाजीराव पेशवे 42 लढाया लढले त्यापैकी एकही लढाई ते हरले नाहीत.. एनडीए सारख्या संस्थेत त्यांच्या युद्ध कलेचे धडे गिरवले जातात..

TOP NEWS MARATHI : महिला पोलीस निरीक्षकाचा विनयभंग करणाऱ्या भाजपाच्या प्रमोद कोंढरेवर कठोर कारवाई करा

त्यांच्या युद्ध कौशल्याचे धडे सैन्यालाही दिले जातात.. छत्रपती शिवरायांचा वारसा यांनी चालवला, अटकेपार झेंडा ज्यांनी रोवला अशा त्यामुळे बाजीराव पेशवे यांचे नाव पुणे रेल्वे स्थानकाला देण्यात यावे अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी केली. त्यांच्या मागणीनंतर विरोधी पक्षानी त्यांच्यावर जोरदार टीका केली. पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका करणारे बॅनर्स (MEDHA KULKARNI BANNER)  लावले. कोथरूडच्या बाई, आपणास नामांतराची एवढी खुमखुमी आली असेल. तर बुधवार पेठेचे नाव मस्तानी पेठ करावं”, असा मजकूर या बॅनरवर देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या या मागणीला ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला होता. या बॅनरवर नावे असणाऱ्या कार्यकर्त्यांना हे प्रकरण चांगलेच भोवलं.डेक्कन पोलीस ठाण्यात कमलेश प्रधान या व्यक्तीने याबाबत तक्रार दाखल केली..गिरीश गायकवाड, अतुल दिघे, विलास सोनवणे या व्यक्तीच्या विरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 चे कलम ३ व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 244 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!