महापौर देखील थेट जनतेतून निवडा; वसंत मोरेंचं राज्य सरकारला आव्हान

282 0

पुणे: राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता सरपंच आणि नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून येणं असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून याच विषयावर मनसेचे राज्य सरचिटणीस आणि पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांनी ट्विट करत राज्य सरकारला आव्हान दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून यावा, याबाबत निर्णय घेतला होता. पण महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलून नगरपालिका, ग्रामपंचायतीमध्ये अस्थिर वातावरण तयार केले. येत्या विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडीचा निर्णय तातडीने बदलून सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याचे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे, जनतेतून नगराध्यक्ष आणि सरपंच निवडीची चर्चा रंगली आहे. त्यासंदर्भातच, मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी ट्विट करत नव्या सरकारला आव्हान दिलं आहे.

Share This News
error: Content is protected !!